आमदार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ

सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य
About-arun-anna-lad

अरुण लाड यांच्या बद्दल थोडक्यात परिचय

अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.

सामाजिक कार्ये

Follow us on Social Media

Facebook

Cover for Arun Lad - अरुण गणपती लाड
44,394
Arun Lad - अरुण गणपती लाड

Arun Lad - अरुण गणपती लाड

🇮🇳Member of Legislative Council
🎓Graduate
🏭chairman Kranti sugar
MLC Pune graduate constituence

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता ३००० रु. जाहीर करण्यात आला आहे. क्रांती कारखान्याने नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे हीत केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली आहे. कारखान्याने स्थापनेपासून यशाची नवनवीन शिखरे सर केली आहेत. गेली अनेक वर्षे कारखाना एफआरपी पेक्षा जास्त दर देण्यात आणि सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याच्या श्रेणीत सातत्याने आघाडीवर राहिला आणि ही परंपरा यावर्षीही कारखान्याने कायम राखली आहे याबद्दल आनंद वाटतो. आणि ही परंपरा यापुढेही जपण्याचा सदैव प्रयत्न राहील.#krantiagrani #krantisugarfactory #FRP #एफआरपी #KUNDAL #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेबांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांच्या विवाह समारंभास उपस्थित राहून वधूवरांना शुभीशीर्वाद देत, पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #Congratulations #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
विधीमंडळातील सहकारी व शिरूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार यांनी आज क्रांती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळास भेट दिली. याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.मा. आमदार अशोक पवार #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
कुंडल गावाच्या प्रज्ञा शरद लाड हिने गोवा येथे झालेली 'आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन' ही स्पर्धा 8 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण केली. जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत तिने हे यश प्राप्त करत सांगलीचाच नव्हे तर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. तिला येणाऱ्या काळातही असेच यश मिळत राहो याच सदिच्छा.#sanglikar #Congratulations #ironman #आयर्नमॅन #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
आपल्या अभिनयकौशल्याने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चित्रपट, नाटक व मालिकांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ गाजवला. त्यांच्यासारखा दिग्गज व चतुरस्त्र अभिनेता काळाच्या पडद्याआड जाणे ही कला विश्वाची मोठी हानी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. #RIP #VikramGokhale ... See MoreSee Less
View on Facebook
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट-ब आणि गट-क साठीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून 'महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा इतिहास' हटविण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ ला आयोगाने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश नसल्याने परीक्षार्थींसह सर्वांनाच धक्का बसला आहे. लोकाभिमुख प्रशासनात अधिकारी म्हणून सहभागी होताना राज्यातील महापुरुषांची कारकीर्द, त्यांच्या कार्याचे योगदान, उभारलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्यातून समाजात घडलेला बदल याबाबतचा अभ्यास परीक्षार्थी करत असतात. विशेषतः सामाजिक चळवळीतील महापुरुषांचे योगदान मिटविण्याचा यातून प्रयत्न होतोय का अशीही शंका उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात इतिहास आणि त्यातही प्रामुख्याने बहुजनवादी महापुरुषांच्या जीवनचरित्रांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. त्यातून महाराष्ट्राच्या युवकांची वैचारिक बैठक पक्की होते. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन नवीन पिढी निर्माण होण्यास मदत होते. पण नवीन धोरणानुसार सर्वांचाच भ्रमनिरास होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबतची भूमिका घेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा पूर्वीच्या पद्धतीनेच अभ्यासक्रमात समावेश करावा.Nationalist Congress Party - NCP #mpsc #MPSCsyallbus #history #maharashtra #NCP #ncpspeaks #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
सातारा जिल्ह्यातील कार्वे येथील प्रवीण थोरात यांनी गोवा येथे झालेल्या 'आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन' या जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत यश मिळवत त्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. प्रवीण थोरात यांच्या यशाने ग्रामीण भागातील युवकांमध्येही कठोर मेहनत व दृढनिश्चयाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपली चमक दाखवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळेल. कठोर मेहनत घेऊ त्यांनी आयर्नमॅन हा 'किताब मिळविला याचा आनंद आहे. त्यांना आगामी काळातही असेच यश मिळत राहो याच सदिच्छा. #Congratulations #ironman #आयर्नमॅन #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
राजे रामराव महाविद्यालय, जत याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. तसेच यावेळी शिक्षणमहर्षी स्व. बापूजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन केले. भारतीय स्वातंत्र्यलढा ते आधुनिक काळातील सहकार क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे लढवय्या नेते असे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचे जीवनचरित्र सर्वांनाच भुरळ घालते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बापूंच्या क्रांतिकारी कार्यास उजाळा दिला. #krantiagrani #krantiagranibapu #krantiagranigdbapulad#jath #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे लोकनेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.. चव्हाण साहेबांनी सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,औद्योगिक या साऱ्याच अंगांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा विकास केला. महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत त्यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांचे जीवनचरित्र नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहील. #yashvantraochavan #यशवंतरावचव्हाण ... See MoreSee Less
View on Facebook
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालात क्रांतिअग्रणी ज्ञानपीठ च्या प्रोजेक्ट् क्रांतीचे विध्यार्थी कु. कविता लाड, सौ, मनीषा जगदाळे व कु. विजय लाड यांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. क्रांती ज्ञानपीठ ने नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता हेरून त्यांना मदत केली आहे. सदर विद्यार्थ्यांची झालेली निवड ही नक्कीच आनंददायक गोष्ट असून अनेक सर्वसामान्य घरातील युवकांना प्रेरणा देणारी आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आपल्या कार्यकर्तृत्वाने नक्कीच आदर्शवत कार्य करून एक आदर्श प्रस्थापित करतील हा विश्वास आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #Congratulations #sti #mpsc #mpsceam #students #kranti #krantiagrani #arulad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्र उत्साहात पार पडले. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतर सहकार चळवळीत क्रांतिकारी कार्य करणारे काही मोजकीच लोकं होऊन गेली त्यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. यंदाचे वर्ष हे बापूंचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नव्याने उजाळा दिला. #krantiagrani #krantiagranibapu #krantiagranigdbapulad#miraj #Arunlad #arunladncp ... See MoreSee Less
View on Facebook
पोलीस दलातील ACP पै. विजय चौधरी व DySP राहुल आवारे व पै. नरसिंग यादव यांनी 'अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धे'त कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा मान वाढविला. अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #Congratulations #wrestling ##poliçe #maharashtra #goldmedal #proudmoment ... See MoreSee Less
View on Facebook

Watch Our Latest Videos

नवीन बातम्या

जनसंपर्क