अंतरावली सराटी या जालना जिल्ह्यातील ठिकाणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पलूसमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. संयम आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करत गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा तसेच सरकारचा याठिकाणी निषेध केला. अशाप्रकारची दडपशाही येणाऱ्या काळात लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.. हे आपण आत्ताच लक्षात घेतलं पाहिजे.


