कोरोनामुळे लांबलेली पुणे विभाग पदवीधर निवडणूक २०२०, अखेर १ डिसेंबर २०२० रोजी होणार असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरूण अण्णा लाड यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे.
आज कोल्हापूर मधे बोलताना मा. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याची काळजी करू नका असे अरूण लाड यांना सांगितले. ९४००० पदवीधर मतदार असलेला कोल्हापूर जिल्हा आहे. जरी गतवेळच्या दोन पदवीधरच्या निवडणुकीत भाजपाची सत्ता असली तरी यावर्षी महाविकास आघाडीची ताकद मोठी आहे. अरूण लाड अण्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. आम्ही अरूण लाड अण्णांना जिंकवून आणू असा विश्वास देत मा. आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी अरूण लाड अण्णांना शुभेच्छा दिल्या.