आझाद मैदान, मुंबई येथे शिक्षकांचे सुरु असलेले आंदोलन व त्यांच्या समस्यांबाबत शालेय शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
आझाद मैदान, मुंबई येथे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक बांधव आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहेत. यापूर्वीही वेळोवेळी भेट देऊन त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या होत्या. यावेळी शासन आदेशानुसार अनुदान सूत्र लागू करून पगारवाढीची शिक्षक बांधवांची मागणी योग्य असून त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी मागणी सन्माननीय मंत्रिमहोदयांना केली. यावेळी त्यांनीही शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून लवकरच योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.
समवेत मा. जयंत आसगावकर, मा. बाळाराम पाटील, मा. किशोर दराडे व मा. विक्रम काळे उपस्थित होते.

