ऊस उत्पादन क्षेत्रातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, उसाचे नवीन बीजोत्पादन, ऊस आंतरपिके, आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञान जाणून घेण्याच्या बहुउद्देशाने दिलेल्या ब्राझील भेटीला आज १२ वर्षे पूर्ण झाली.
ऊस उत्पादन क्षेत्रात ब्राझीलने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. अगदी ऊस लागवडीपासून ते अगदी ऊस तोडणीपर्यंत तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याचा फायदा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भेटीत नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेता आले. चांगले उत्पादन देणाऱ्या ऊस पिकांच्या जाती व त्यांचे लागवड तंत्रज्ञान, गुणवत्ता संशोधन केंद्रातील प्रगत तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, ऊस लागवडीनंतर आंतरपिके कोणती घ्यावीत. कमी पाण्यामध्ये ऊस पीक कसे घ्यावे, ठिबक सिंचन अशा विविध विषयावर जाणून घेता आले. तसेच ब्राझीलमध्ये उसापासून बनविण्यात येणाऱ्या इथेनॉलचा पेट्रोलमध्ये २३% वापर केला जातो. ब्राझीलच्या या तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळण्यासाठी व वाढत्या पेट्रोल, डिझेल च्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होणार आहे. इथेनॉल निर्मितीला चालना देत ब्राझीलच्या पाऊलावर पाऊल टाकत आपल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन कार्य केले आहे आणि यापुढेही नक्कीच करत राहू..
यावेळी समवेत इंदापूरचे माजी आमदार मा. हर्षवर्धन पाटील, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मानसिंगराव नाईक, माढ्याचे आ.बबनदादा शिंदे, विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राजारामबापू कारखान्याचे पी. आर. पाटील व इतर सन्माननीय मान्यवर होते.




