आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी विधानभवन पायऱ्यांवर घसरलेले कांद्याचे दर व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मा. अरुण (अण्णा) लाड यांनी आंदोलन केले.
याप्रसंगी बोलताना मा. अरुण (अण्णा) लाड यांनी गेल्या काहीकाळापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकरी बांधवांना कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली असताना राज्यसरकार यावर कोणताही निर्णय न घेता सत्तानंदात मश्गुल आहे असा हल्लाबोल सरकारवर केला. तसेच यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख समजून घेत कांद्याचे किमान मूल्य घोषित करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या उपस्थित सर्व नेत्यांकडून करण्यात आली.
