जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या स्वीय निधीतून कुंडल येथील बाळोबा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत असून या मंदिरांच्या सभामंडप उभारणीचे भूमिपूजन पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आ. अरुण लाड म्हणाले, ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे व सर्वसामान्यांचे हित जोपासले जाणेसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून शरद लाड घेत असलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. येथील बाळोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावून याचे काम त्वरित व्हावे यासाठी शरद लाड यांनी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्णत्वास येतोय असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागातील विकासकामे पुर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असून यापुढेही विविध विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहे व ती निरंतर केली जातील, अशी ग्वाही आ. अरुण लाड यांनी उपस्थितांना दिली.


