कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मा. सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या.
यावेळी पलूस कडेगाव तालुक्यातील आशा सेविकांना सायकल वाटप , स्व. विजयाकाकू लाड नाना नाणी पार्कचे उदघाटन पार पडले.
खऱ्या अर्थाने महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत म्हणजे ते कुटुंब स्वावलंबी होईल. स्व. डॉ. जी डी बापू लाड यांच्या स्मारकाचे उदघाटन हे तेव्हाच होईल जेव्हा या स्मारकात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभा राहील.
यावेळी आमदार मा. मानसिंगभाऊ नाईक , आमदार सुमनताई पाटील ,ऍड प्रकाश लाड ,किरण लाड , शरद लाड आणि विविध मान्यवर उपस्थित होते.




