कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून मुस्लिम दफन भूमीच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण केले.
कुंडल येथील मुस्लिम समाजाची दफनभूमी रस्त्यालगतच असल्याने त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी समाजाने संरक्षक भिंतीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून 8 लाख 50 हजारांचा निधी खर्च करून संरक्षक भिंत बांधून दिली. तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांना त्यांची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्यांना समाजोन्नतीसाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल याबद्दल आश्वस्त केले. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी त्यांची समस्या सोडविल्याबद्दल आभार मानले.


