कुंडल येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २ कोटी ७३ लक्ष रकमेच्या पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन केले.
मा. शरद लाड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५ कोटी २५ लक्ष मंजूर करून घेतले होते. त्यातून जॉकवेल, इंटकवेल, दोन पाण्याच्या टाक्या व १६ कि.मी. पेक्षा अधिक पाण्याची जूनी पाईप लाईन काढून नवीन बसवली होती. परंतू यातून सूध्दा कुंडल शहराची पाण्याची समस्या दूर होत नाही हे लक्षात येताच वाढीव २ कोटी ७३ लक्ष इतका निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करूंन दिला. हे काम पुर्णत्वास गेल्याने कुंडलकरांना मुबलक व शुद्ध पाणी मिळेल हा विश्वास आहे. या योजनेच्या पुर्णत्वामुळे भविष्यात संपूर्ण गावसह देशमुख मळा, सावंत पट्टा, डुबल मळा, खडी भाग, चव्हाण मळा या भागातही पूर्ण क्षमतेने पिण्याचे पाणी पोहोचणार आहे.
कुंडलला 1972 च्या दुष्काळात स्वर्गीय क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापूंनी किर्लोस्कर कंपनीच्या सहकार्याने स्टँड पोष्ट द्वारे पिण्याचे पाणी दिले. पुढे 1974 साली कुंडल प्रादेशिक योजनेतून 17 गावाला पाणी दिले, गाव वाढल्याने 2007 साली जल स्वराज्य योजना आखून गावाला शुद्ध पाणी पुरवठा केला, यासाठी सुरुवातीला 3 कोटी, नंतर 5 कोटी 25 लाख आणि आता 2 कोटी 73 लाखांचा निधीतून गावाला पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनवणे हे बापूंचे स्वप्न सत्यात उतरवणेसाठी उचललेले पाऊल आहे. भविष्यात गावाला 24 तास 7 दिवस पाणी पुरवठा करण्याचा मानस आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल हा विश्वास आहे.


