कुंडल शहराच्या विविध विकासकामांसाठी मंजूर १ कोटी ४७ लाख रुपये रकमेतून विविध विकासकामांचा मा. अरुण (आण्णा) लाड यांच्या हस्ते शुभारंभ..

कुंडल शहराच्या विविध विकासकामांसाठी मा. अरुण (आण्णा) लाड यांच्या विशेष प्रयत्नातून 1 कोटी 47 लाख रु. मंजूर केले होते. सदर रक्कमेतुन साकारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण मा.आ. अरुण अण्णा लाड, मा.किरणतात्या लाड यांच्यासह समवेत ग्रामपंचायत सदस्य, तथा गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम त्वरित होणे गरजेचे होते. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 79 लाख रु. रकमेचे काम करण्यात आल्याने याचा रुग्णांना नक्कीच लाभ होईल. यासह गावातील जी.डी.बापू लाड नगर रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे (20 लाख) रु, जी.डी. बापू लाड नगर अंगणवाडी लोकार्पण (8 लाख), पंचशील नगर याठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण (20 लाख), रोहिदास नगर येथे अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10 लाख) व लक्ष्मी चौक येथे अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10 लाख) या कामांचा शुभारंभ मा. अरुण (आण्णा) लाड याच्या हस्ते करण्यात आला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top