कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या इमारतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रस्तावित इमारतीची माहिती घेतली. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने कुपवाडकरांची अनेक वर्षांची सुसज्ज हॉस्पीटलची प्रतिक्षा पूर्ण होत असल्याने खूप कौतुक वाटतंय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे आहे. या रूग्णालयात सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी माझ्या समवेत ना.डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती निरंजन आवटी व इतर मान्यवर उपस्थित होते.Jayant Patil – जयंत पाटीलVishwajeet KadamNationalist Congress Party – NCP