पेट्रोल, डिझेल , खाद्यतेल व गॅस चे दर अव्वाच्या सव्वा वाढवून सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा घालायचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने देशातील बऱ्याच महत्वपूर्ण कंपन्यांचे सुद्धा खासगीकरण केले आहे. नेमके मोदी सरकार करते काय आहे? सामान्य जनतेचे जगणे मुश्किल होत आहे. पेट्रोल डिझेल , खाद्यतेल आणि गॅसची दरवाढ तर सामान्य जनतेला न पेलणारी आहे. केंद्र शासनाकडून वारंवार होत असलेल्या पेट्रोल, डिझेल ,खाद्यतेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज कडेगांव चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई जाधव, युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा पुजा लाड, कडेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयदिप यादव, युवक तालुकाध्यक्ष सुरेश शिंगटे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा वैशालीताई मोहिते, वैभव दादा पवार, सर्व कडेगांव तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, व कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल ,डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ कमी झालीच पाहिजे !