जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे कोयना अभयारण्य पुनर्वसन योजने अंतर्गत प्रकल्पग्रस्त लोकांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली.
कोयना अभयारण्य येथील बाधित लोकांना पुनर्वसन योजनेअंतर्गत अद्याप ही शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यानिमित्त आज मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कोयना अभयारण्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या यादीच संकलन करून त्यांना घरे व कसण्यायोग्य जमिनी देण्यात याव्यात तसेच त्या जमिनीला पाणी मिळावं जेणेकरून सन्मानपूर्वक उदरनिर्वाह करता येऊ शकेल, आणि हे सर्व होत नाही तोपर्यंत त्यांना निर्वाहभत्ता देण्यात यावा अशी मागणी यावेळी केली.

