महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यात पावसाने दिलेल्या उघडीपिने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आत्तापर्यंत इतके दिवस पोसलेली व हातातोंडाशी आलेली पिके जगविणे अशक्य झालेले आहे. अशा अवस्थेत आपल्या कोयनेसह सर्व धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे.
कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी न वापरता, ते नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी वापरावे व भविष्यातील पाऊसमानावर वीज निर्मितीकडे ते वळवावे अशी मागणी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे करत त्याबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सत्वर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

