क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सातारा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे आयोजित अग्रणी महाविद्यालय योजना कार्यशाळेस उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. डॉ. रणधीर शिंदे सरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू म्हणजे महाराष्ट्राचे उतुंग व्यक्तिमत्व. ते ग्रामीण भागातून आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून विकसित झालेले एक खंबीर नेतृत्व होते. कुमारवयातच स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करू लागल्यामुळे ग्रामीण भागातील जनमानसाचा अचूक अंदाज त्यांना येत असे. ग्रामीण भागात भूमिगत स्वातंत्र्यसैनिक म्हणून व सहकारी चळवळीत कार्य करीत असतांना त्यांनी अफाट लोकसंग्रह केला. प्रत्येक कार्यास सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची सांगड घालत भविष्याचा वेध घेत त्यांनी वाटचाल केली. त्याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहून आनंद झाला. यावेळी क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंच्या कार्यास उपस्थित अनेक मान्यवरांनी उजाळा दिला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top