क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकाबरोबरच द्राक्ष पिकाचे क्षेत्र भरपूर आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीबरोबर द्राक्ष पिकामधील ऑक्टोबर छाटणी व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढ या अनुषंगाने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक, कुंडल येथे ‘द्राक्ष पीक चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
निर्यातक्षम द्राक्ष, रेसीड्यू मॅनेजमेंट आणि नवीन जाती, द्राक्षशेतीतील माती परीक्षण, खत व पाणी व्यवस्थापन, द्राक्ष पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माहिती व्हावी या हेतूने यावेळी तज्ञ मार्गदर्शकांकडून उपयुक्त असे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


