क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या 20 व्या गाळप हंगाम शुभारंभ पार पडला. यावेळी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून हंगाम शुभारंभ करण्यात आला.कारखान्याने कोणाचे ही देणे ठेवले नाही यामुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. कितीही अडचणी आल्यातरी पुढचा गळीत हंगाम सर्व शेतकरी बांधव व सभासदांच्या मदतीने यशस्वीपाने पार पडेल यात शंका नाही. साखर उद्योग खासगीकरणाकडे झुकत असल्याने हा सहकारावरील हल्ला आहे यात आपण टिकले पाहिजे, तो टिकवण्यासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारखाना ऊस विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहे त्यामुळे शेतऱ्यांचे उत्पादनात वाढ झाली आहे, त्यामुळे आर्थिक स्थर उंचावत आहे. उसाला अजूनही दर देणं शक्य आहे पण शासकीय स्थरावर हमीभाव ठरवून त्याला शासकीय अनुदान देणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीची सांगड घातली तर हेही शक्य आहे. ज्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी पाहिजे त्यांनी हक्काने घेऊन जावे मागच्या वर्षी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यानी एफआरपीची रक्कम नेली यावरून शेतकऱ्याला ही हप्त्याने रक्कम हवी असल्याचे दिसते.यावर्षी 14 लाख मे.टन ऊसाची उपलब्धता आहे, यातून 10 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखाना शेतक-यांचे एकरी उत्पादन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित आहे, ठिबक सिंचन योजना, रासायणिक खतांचा पुरवठा, दर्जेदार ऊस रोपांचा पुरवठा, बांधावर जाऊन शेतक-यांना माहिती देणे, तसेच तोडणी यंत्रणाही अद्ययावत केली आहे यामूळे शेतक-यांनी फक्त कष्ट करणेची तयारी ठेवावी आणि उत्पादन वाढीवर भर द्यावा” तसेच ऊस गाळप क्षमता साडेसात हजात मेट्रिक टन केली जाणार आहे, पुढच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीची ही क्षमता वाढवली जाईल. Krantiagrani Dr G D Bapu Lad Sahakari sakhar Kharkhana ltd. Kundal