क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना साईट कुंडल याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करून सर्व कुस्तीवीरांना शुभेच्छा दिल्या..
कुस्ती हा लाल मातीतला, रांगड्या पैलवानांचा खेळ. कुंडल म्हणजे कुस्तीवीरांची पंढरीच. येथील मातीने अनेक कुस्तीवीर घडवले. कुस्तीवीरांच्या लढवय्या वृत्तीने कुंडलचे नाव नेहमीच उंचावले गेले आहे. कुंडलच्या या लढवय्या मातीने कुस्तीची गौरवशाली परंपरा आजही जपली आहे हे पाहून अभिमान वाटतो. नवोदय विद्यालय येथील स्पर्धा पाहून आनंद झाला.


