क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी व 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्रबोधन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा दिला..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकार चळवळीमधील तुफान सेनेच्या माध्यमातून क्रांतिअग्रणीं. डॉ. जी. डी. बापू लाड यांनी ऐतिहासिक लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या स्वतंत्रता सेनानींनी सक्रिय भाग घेतला, देहदंड सोसला आणि परकीय सत्तेचा निकराने लढा दिला त्यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटींशांविरुद्ध कडवा प्रतिकार करणारा आक्रमक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य भारतात समाजकारण करत विकासात्मक कार्याशी वाहून घेणे ही त्यांची दोन रूपे नक्कीच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या संपूर्ण कार्यावर आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रसाद कुलकर्णी यांनी टाकलेला दृष्टिक्षेप कौतुकास्पद होता. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

