आज रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी कॉलेज प्रशासनाने केलेल्या सत्काराचा स्वीकार करीत अनेक शैक्षणिक बाबींवर सांगोपांग चर्चा केली.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीच्या इतिहासात रयत शिक्षण संस्थेचं योगदान अद्वितीय आहे. समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करत, जातीधर्माला बाजूला सारत सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना एका छताखाली आणत सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे कार्य महाराष्ट्रात पहिल्या प्रथम कोणत्या शैक्षणिक संस्थेने केले असेल तर ते रयत शिक्षण संस्थेनेच.
ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुले शिकून प्रशासनाच्या, तसेच राजकारण, समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली सुरु केलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय हे पाहून आनंद होतोय. महाविद्यालयाच्या एकूणच कामकाजाविषयी जाणून घेत आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी व उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

