पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामुळे पलुस तालुक्यातील कृष्णा काठच्या परिसरात पूरपरिस्थिती उद्भवली आहे.पलुस तालुक्यातील कृष्णा काठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याचे समजताच येथील परिसराची पाहणी केली. भिलवडी, माळवाडी या परिसरात पाहणी केल्यानंतर या परिसरातील प्रशासनाला , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तेथील नागरिकांसाठी मदत व विविध उपाययोजना करण्याची सूचना केली.