क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आला आहे. १००% पेपर विरहीत काम करण्याचा मानस कारखान्याचा असून याचाच एक भाग म्हणून व्हाट्सअप चॅट-बॉट मार्फत शेतकऱ्यांना उस उत्पादनासंदर्भात महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून उसाचे बिल, नवीन ऊस नोंद, पाठीमागील ऊसाच्या नोंदी, ऊसाचे वजन यासह शेतकऱ्यांना आपली थेट तक्रार कारखाना प्रशासनाकडे पोहविता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये 9156945050 हा क्रमांक सेव्ह करून व्हाट्सएप वरून hi असा मेसेज पाठवल्यानंतर संपूर्ण माहिती मिळेल.आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मार्फत या उपक्रमाचे लोकार्पण क्रांती कारखाना कार्यस्थळावर पार पडले.