बलवडी फाट्यावर होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवित हानी याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या चौकाचे रुंदीकरण केले जाणे आवश्यक होते. आज येथील चौक रुंदीकरण आणि सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन केले. ३० लाख रुपये रकमेचे हे काम असून ते लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कडेगावकडून बांबवडेकडे जाणारा आणि विट्याकडून कुंडलकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी गजबजलेल्या बलवडी फाट्यावर रस्त्याची रुंदी कमी असल्याने वारंवार अपघात होत होते. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार या कामाला मूर्त स्वरूप आज येत आहे.

