बांबवडे येथे मा. शरद लाड यांच्या जिल्हा परिषद निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उदघाटन केले. तसेच यावेळी बांबवडे येथील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मा. शरद लाड यांनी नेहमीच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन घेऊन वाटचाल केली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी बांबवडे येथे करोडो रुपयांची विकासकामे केली आहेत. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही दिली. ग्रामस्थांनी गावात केलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.


