महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समिती बैठक पार पडली. विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करून विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी देण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती अपुऱ्या सुविधेअभावी बिकट असून त्यांनाही निधी मिळण्याची गरज आहे याकडे लक्ष वेधले. तसेच ग्रामीण रस्त्यांसाठी निधी मंजूर व्हावा, तसेच जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटनक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठीही निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात, विकास कामासंदर्भात, चालू तसेच हंगामी प्रकल्पांसंदर्भात सन्माननीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.
सादर बैठकीस आ. प्रणिती शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, सोलापूरचे जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


