मावळचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा. मावळ तालुक्यात जलयोजना सक्षम व्हाव्यात यासाठी आपण अहोरात्र झटत आहात. आपल्या या बहुमोल कार्यामुळेच पाण्यापासून वंचित असणारी कितीतरी हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. गेल्या २ वर्षात मावळचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवी या देवस्थानाचा आपण कायापालट केला. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मजबूत रस्ते व्हावेत यावर जोर दिला. सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आपले काम खरोखरचं अतुलनीय आहे. समाजाप्रती बांधिलकी जपत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करणे हे तर आपले नित्याचेच कार्य आहे. मावळकरांची अनेक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आई एकवीरा देवी आपणास दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा.Sunil Shelke#happybirthdayNationalist Congress Party – NCP