पलूस तहसीलदार कार्यालयात क्रीडा संकुलाचे रखडलेले काम व इतर कामांची माहिती घेत मा. अरुण (आण्णा) लाड यांनी आयोजित बैठकीत सर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रशस्त असे क्रीडा संकुल पलूस येथे उभारले जातेय ही खूप महत्त्वपूर्ण बाब असून याचा पलूस सह आजूबाजूच्या गावातील क्रीडापटूंना देखील मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
पलूससह तालुक्यातील अनेक क्रीडापटूंना सर्व सोयी सुविधांनीयुक्त असे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. येथील पदाधिकारी व कर्मचारी वर्गाची केवळ मिटींग घेऊन आता न थांबता हे काम अधिक वेगाने कसे पूर्ण होईल याची दक्षता घेतली जाईल. पुढील बैठकी पर्यंत सर्व कामे मार्गी लागली पाहिजेत अशी सूचना यावेळी संबंधितांना त्यांनी दिली.