राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते, मा. रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानपरिषद उमेदवारी निश्चिती झाली, त्याबद्दल त्यांची भेट घेत मा. अरुण (आण्णा) लाड यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या..
मा. रामराजेंनी महाराष्ट्राच्या राजकीय परिघात नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शांत, विनम्र, संयमी, मा. रामराजे यांची वैचारिक तोफ पुन्हा एकदा विधानपरिषद पुन्हा एकदा विधान परिषदेत धडाडेल. मा. रामराजे यांच्यासह मा. एकनाथराव खडसे साहेब ही निवडून येतील व पक्षाचं बळ वाढेल, असा विश्वास मा. अरुण (आण्णा) लाड यांनी व्यक्त केला.