क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ५ व्या वार्षिक अधिमंडळ सभेस उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन केले.
सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्था चालवणं कठीण काम आहे, परंतू क्रांती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी अतीशय काटकसरीने, योग्य नियोजनातून वित्तीय सेवा देत आहे. अगदी तीन वर्षांतच सोसायटी सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. लहानातील लहान माणसांची पत वाढली पाहीजे, अत्यल्प व्याजात कर्ज उपलब्ध झाली पाहिजेत या भुमीकेतून स्थापीत झालेली ही संस्था प्रामाणिकपणे कार्यरत आहे.
पारदर्शी कारभारामुळे ठेवीदारांचा ओढा सुध्दा संस्थेकडे वाढत आहे याचं समाधान आहे. अल्पावधीत संस्थेने १३ कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून वसूल भागभांडवल ८१ लाख, कर्जवाटप १० कोटी असून संस्थेची प्रगती उल्लेखनीय आहे, ही गौरवाची बाब आहे.
संस्थेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा २०२२ सालचा पुणे विभाग गट क्र १ “दिपस्तंभ पुरस्कार” मिळाल्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. याप्रसंगी समवेत संस्थेचे संस्थापक मा. शरद लाड, चेअरमन धन्यकुमार पाटील, सर्व सभासद,संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.


