मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आमचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांची भेट घेतली.
सार्वजनिक जीवनात काम करत असताना शिस्त म्हणजे काय याचा प्रत्यय मा. अजितदादा पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर येतो. यावेळी त्यांच्याशी पदवीधर युवकांच्या समस्यांबाबत व मतदारसंघातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली.
समवेत मा. दौलत दरोडा, मा. शेखर निकम व इतर मान्यवर उपस्थित होते.
