सध्या कोरोनाने घातलेला थैमान आपल्याला माहित आहेच , त्यात केंद्र सरकारने घातलेला थैमान वेगळाच ! ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे , त्या राज्यात लसीकरण जास्त केला जात आहे. मुंबई ,पुणे आणि नाशिक सारख्या शहरात परप्रांतीय लोकांचे येणे जाणे जास्त होते. अशा अनेक कारणांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर अधिकच वाढत गेला .कोरोनाचा धोका वाढण्याची संभाव्यता अद्यापही नाकारता येणार नाही. त्यात महाराष्ट्रात अजूनही सक्रिय रुग्णसंख्या जास्त असून , नेमक्या कोणत्या कारणासाठी महाराष्ट्राला लसींचा कमी पुरवठा केला जात आहे ?
२१ जून रोजी भारतात एकूण ८० लाख लसीकरण करण्यात आले. २१ जून २०२१ रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लसींच्या बाबतीत आकडेवारी जाहीर केली .या आकडेवारीनुसार महाराष्ट्राला एकूण 3,78,945 इतका लसीकरण झाले . पण एक महत्वाची बाब म्हणजे गुजरात राज्यात 5,02,173 , कर्नाटक राज्यात 10,67,734 तर मध्यप्रदेशात 15,42,632 इतके लसीकरण केले गेले . २०२१ च्या माहिती नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या १२. ६२ करोड इतकी आहे , तर गुजरातची लोकसंख्या ७.१५ करोड इतकी आहे . त्याचबरोबर मध्यप्रदेशची लोकसंख्या ८. ६४ करोड , कर्नाटकची लोकसंख्या ७.०५ करोड इतकी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत या राज्यांची लोकसंख्या कमीच आहे,तरी या राज्यांत लसीकरण महाराष्ट्रापेक्षा जास्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त रुग्णसंख्या ही महाराष्ट्रातच आहे , तरी या राज्यांत लसीकरण जास्त का ?
पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात , कोणत्या ठराविक पक्षाचे किंवा राज्याचे नसतात. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातची लोकसंख्या कमी आहे तरीही गुजरात सारख्या राज्यांनाच लसीकरण जास्त केले जात आहे. जिथे जिथे भाजपाचे सरकार आहे तिथेच लसीकरण जास्त केले जात आहे . महाराष्ट्रावर हा अन्याय नेमका कशासाठी ? महाराष्ट्राशी हा नेमका दुजाभाव कशासाठी ? केन्द्र सरकार म्हणतंय की आम्ही गरीब जनतेसाठी आहे ..सर्वसामान्यांसाठी आहे ..मग महाराष्ट्रात सर्वसामान्य आणि गरीब जनता नाही का ?
” जिथं भाजपचे सरकार तिथंच लसीकरण जास्त ! ” … याला नेमके काय म्हणावे ??