यश मोदींचं , अपयश जनतेचं !

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेला भीकेला लावण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे . असे असून सुद्धा , ग्लोबल अप्रुवल रेटिंगमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी जगामध्ये पहिले आले ! पण, भारतातील सर्वसामान्य जनता मोदींना घेऊन किती खुश आहे ? अजून एक बाब म्हणजे,या रेटिंग मध्ये भारतातील फक्त 2,126 लोकांचे सर्वेक्षण/मत घेण्यात आले होते. यामध्ये अमेरिका , ब्रिटन ,रशिया, ऑस्ट्रेलिया ,कॅनडा , ब्राझील , फ्रांस , जर्मनी अशा फक्त १३ च देशांचा समावेश होता ! यामध्ये चीन व जपान सारख्या इतर प्रगत देशांचा यामध्ये समावेशच नव्हता ! मग लोकप्रियतेच्या बाबतीत मोदीजी जगात पहिले कसे ?
आता या रेटिंग मध्ये फक्त २१२६ लोकांचे मत घेण्यात आले होते , मग बाकीची जनता मोदींना घेऊन किती खुश आहे ? मोदी सरकार ने सगळ्या जीवनावश्यक वस्तू महाग करून , सामान्य जनतेचे जगणे हैराण करून ठेवले आहे .जिथे महिन्याला एका सामान्य माणसाला रेशन भरण्यासाठी ४ ते ५ हजार लागायचे , आता त्यासाठी ८ ते १० हजार खर्च करावा लागतो. जर अशा गोष्टी असतील ,तर सामान्य जनता मोदींना घेऊन खुश असेल का ? शेतीसाठी लागणारी बी-बियाणे सुद्धा किती तरी रुपयांनी महाग झाले आहेत. एकीकडे “आपण शेतकऱ्यांसाठी आहोत ! ” असे ढोंग केले जाते, दुसरीकडे बी – बियाणांचे रेट अव्वाच्या सव्वा लावले जातात ! या मध्ये सर्वसामान्य शेतकरी खुश असेल का ? एवढे शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे हाल करून मोदीजी जगात पहिले कसे ?
२०१४ च्या निवडणुकीत , ” बहुत हुई पेट्रोल की मार, अब की बार मोदी सरकार ! ” हा नारा लावला जात होता ! आता तुम्हीच विचार करा …पेट्रोलचे दर नेमके कुणाच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त आहेत ? १०३ रुपये इतके पेट्रोल दर फक्त आणि फक्त मोदी सरकारच्या काळात झाली असून, एवढी पेट्रोल दरवाढ या आधी कधीच झाली नव्हती ! सर्वसामान्य जनतेला हे न परवडणारेच आहेत. गॅस आणि खाद्यतेल यांचे रेट सुद्धा आभाळाला नेऊन ठेवले आहेत. सामान्य जनतेच्या खिशावर फक्त दरोडा टाकायचे काम मोदी सरकार करत आहे. एवढं सगळे असूनही मोदीजींची लोकप्रियता प्रथम क्रमांकावर नेमकी कशी काय ?
इतकेच नव्हे तर भारताची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे. याचा परिणाम भारताच्या जिडीपी ग्रोथ रेटवर सुद्धा पडलेला दिसत आहे. भारताची अर्थ व्यवस्था दिवसेंदिवस बिघडतच आहे. केंद्र सरकार नेमके काय करत आहे ? २०२० -२१ च्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी -७.३% इतका खाली आला आहे . आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून एवढा जिडीपी कधीच खाली आला नव्हता. म्हणजेच हा देशाचा आतापर्यंत सगळ्यात खराब जिडीपी ग्रोथ रेट आहे. ही आताच्या सरकारची सगळ्यात मोठी हार आहे. कोव्हीडची परिस्थिती असताना देखील चीन सारख्या देशाचा जिडीपी ग्रोथ रेट चांगलाच होता.
इतकेच नव्हे तर बांगलादेश सारख्या देशाचा जिडीपी ग्रोथ रेट चांगला आहे आणि तो सातत्याने सकारात्मकच आहे. मग भारताच्या जिडीपी ग्रोथ रेटचे काय? देशामध्ये अजून किती तरी लोक दारिद्र्य रेषेखाली येताना दिसत आहेत. किती तरी लोक बेरोजगार होत चाललेले आहेत. सध्याचे सरकार गरीब जनतेचा विचार करताना मात्र अजिबात दिसत नाही. मोदी सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय , भारतीय अर्थव्यवस्थेला अजून किती खाली घालवणार आहे ? आपला भारत देश खरंच महासत्तेकडे जात आहे का ? याची पडताळणी करून बघणे गरजेचे आहे. आधी केलेली नोटबंदी आणि त्या नंतर आलेले अर्थसंकट सर्वज्ञात आहे. असे वाटत आहे की , चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यात मोदी सरकार मास्टर आहे.
महागाई , सर्वसामान्य जनतेचे हाल आणि बिघडती आर्थिक परिस्थिती .. एवढ्या सगळ्या गोष्टी मोदीजींच्या सरकारमध्ये असून , ग्लोबल अप्रुवल रेटिंगमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी जगामध्ये पहिले कसे आले ? इतकेच नव्हे तर या सर्वेनुसार मोदींची लोकप्रियता २० % नी कमी ही झाली आहे. सामान्य जनतेत मोदींची प्रतिमा वेगळी दाखवली जात आहे का? त्यांच्या नावाचे एकदम चालाखीने मार्केटिंग करून जनतेला फसवलं जात आहे का? मार्केटिंग करून देश नाही व्यापार चालतो ! देश चालवण्यासाठी आर्थिक धोरण मजबूत करण्याची गरज आहे. महागाई वाढवून आणि सर्व सामान्य जनतेला भीकेला लावून नेमके मोदी लोकप्रियतेच्या बाबतीत जगात पहिले कसे ?
जनतेची चाललेली पिळवणूक जर थांबायची असेल तर , आता खरंच मोदी सरकारला जनतेने बदलण्याची वेळ आली आहे . बदल हा झालाच पाहिजे !

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top