रयत शिक्षण संस्था, साताराचे बळवंत कॉलेज, विटा येथे स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय चर्चा पार पडली.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आणि त्यानंतर बदलत्या काळाशी सांगड घालत सहकार क्षेत्रात दिलेले योगदान अद्वितीय असेच आहे. प्रतिक्रांती चळवळीचे फिल्ड मार्शल ते आधुनिक काळातील सहकार क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे, विकासाला वाहून घेणारे शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढवय्या नेते अशा व्यापक स्वरूपातील त्यांचे व्यक्तिमत्व अनेक लेखक तसेच साहित्यिकांना भुरळ घालत नसेल तर नवलच. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचे हे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त बळवंत कॉलेज, विटा येथे आयोजित चर्चेप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी बापूंच्या क्रांतिकारी कार्यास उजाळा दिला. तसेच यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.



