राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय सांगली येथे मा. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. मा. जयंत पाटील यांनी बैठकीस संबोधित करताना सांगितले की, सांगली जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्ते पूर्ण जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्याची भूमिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी, जास्तीत जास्त लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली जावीत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन वाढ व इतर विषयांवरती त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

