सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार निगरगट्ट काळजाचे आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून हातची पिके लयास गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे शासनाकडून योग्य मदत मिळणे आवश्यक आहे.
यासाठीच विधानभवन याठिकाणी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत अतिवृष्टीसाठी मदत जाहीर करावी व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी केली. याप्रसंगी समवेत विरोधीपक्ष नेते मा. Ajit Pawar दादा, मा. Jayant Patil – जयंत पाटील साहेब , मा. Chhagan Bhujbal , मा. Balasaheb Thorat व इतर मान्यवर उपस्थित होते.

