मा. अरुण गणपती लाड यांच्या हस्ते ज.म. करपे हायस्कूल शिरढोण- बोरगाव येथील टिकरींग लॅंबचे उद्घाटन .

शिरढोण- बोरगाव येथील ज.म. करपे हायस्कूल याठिकाणी मा. अरुण अण्णा लाड यांचे हस्ते टिकरींग लॅंबचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी काही काळ हितगुज केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुद्धा संवाद साधत विविध प्रश्न उपस्थित केले, मा. अरुण अण्णा लाड यांनी अगदी मनमोकळेपणाने चर्चेत सहभाग घेतला.

मुळात विज्ञान म्हणजे कुतुहूल. विद्यार्थी दशेत शिकत असताना मुलांना दररोज नवनवीन कोडी पडत असतात. या साऱ्या कोड्यांची उकल बहुतांश वेळा विज्ञानाजवळचं येऊन थांबते. एकदा का विज्ञान समजून – उमजून घेतलं कि मग मात्र विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच वाढीस लागतो. या नव्या टिकरिंग लॅब मुळे विद्यार्थ्यांना अनेक नव्या वैज्ञानिक संकल्पना अगदी मुद्देसूदपणे कळणेस नक्कीच लाभ होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले.

उदघाटन प्रसंगी समवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी) पुणेचे समाजकल्याण अधिकारी मा. बाबासाहेब भोसले व शिरढोण, अलकूड व बोरगावचे सरपंच, उपसरपंच तथा येथील विविध सोसायट्यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, हायस्कुलचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top