शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडिया कडून साखर कारखानदारी क्षेत्रामधील प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार 2023.

कोणताही पुरस्कार प्राप्त होणं हि अत्यंत समाधानाची गोष्ट असते, कारण आपण केलेल्या कामाचं चीज झालं अशी भावना कुठेतरी मनाला सुखावणारी नक्कीच असते. शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार मला प्राप्त झाला. याबद्दल बऱ्याच ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कुंडल येथील प्रभाग क्र. 6 मधील ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा नुकताच सत्कार करण्यात आला. यासाठी त्यांचे खूप खूप आभार.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मा. शरद लाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. क्रांतिअग्रणी परिवाराच्या उन्नतीसाठी आणि जनतेच्या विकासासाठी नेहमीच आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील. तसेच कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कुंडलचे अनिल पवार, अशोक विभूते व दिलीप थोरबोले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top