सांगलीतील कामगार भवन येथे सांगली जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजने संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करत बैठक संपन्न झाली.
आजवर फेडरेशनच्यावतीने सवलतीच्या दराबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे रु. 1.16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये रु. 25/- प्रति के. व्ही. ए. प्रति महिना इतकी सवलत दि. 31/03/2024 पर्यंत कायम ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. पण बीलावरती प्रति युनिट 60 पैसे व्हीलिंग चार्जेस आणि इंधन अधिभार प्रति युनिट 65 पैसे ही बिलातून रद्द झाला पाहिजे. अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. पाटबंधारे विभागाने उपसा जलसिंचन योजनांना पाणीपट्टीची सरळ दराने आकारणी केली नाही तर तिन्ही जिल्ह्यातील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू असे स्पष्ट मत यावेळी मांडले.

