सांगली जिल्हा पालकमंत्री मा. ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून विकासकामांचा आढावा घेत सविस्तर चर्चा केली.
यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी रस्त्यांची हालत खराब असून रस्त्यांसाठी निधी मंजूर व्हावा, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे याकडे तसेच तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्रांच्या विकासाकडेही यावेळी सन्माननीय पालकमंत्र्यांकचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात व प्रगतीपथावर असलेल्या तसेच प्रस्तावित प्रकल्पांसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा केली.
यावेळी खा. संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी मा. राजा दयानिधी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.



