सांगली जिल्हा स्थापत्य (सु.बे.) अभियंता संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा १३ वा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या स्थापत्य अभियंत्यांना पुरस्कार प्रदान केला.
आपल्या कल्पक बुद्धिमतेतून राष्ट्रविकासात महत्वाची भूमिका बजावणारे घटक म्हणजे स्थापत्य अभियंते. विज्ञानाचा मानवी गरजांसाठी प्रत्यक्ष वापर व जीवनाच्या गुणवत्तेसाठी झटत तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व समाज या दरम्यानचा दुवा बनून स्थापत्य अभियंत्यांनी कार्य केले आहे. रस्ते, इमारती, उड्डाणपूल किंवा कोणताही विकासाचा प्रकल्प असेल स्थापत्य अभियंत्यांनी नेहमीच आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद झाला.
यावेळी समवेत सांगलीचे खा. संजय काका पाटील , आ. अनिल भाऊ बाबर, आ. विक्रम सावंत , इंजि. महावीर पाटील सांगली जिल्हा सु.बे. अभियंता संघटना अध्यक्ष तसेच सांगली जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अभियंते तसेच इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते..



