सागरेश्वर अभयारण्य संदर्भातील विविध समस्या व अडीअडचणी याबाबत मा. अरुणआण्णा लाड यांची वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत चर्चा..

सागरेश्वर अभयारण्य संदर्भातील विविध समस्या व अडीअडचणी याबाबत मुंबई येथे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस समवेत सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल, वनरक्षक, किरण तात्या लाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अभयारण्याच्या वन संपदेचा प्रश्न, बेकायदा व राजरोस होत असलेली वृक्षतोड, कुंपण नसल्यामुळे उदभवणाऱ्या विविध समस्या, स्थानिक नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी, अरण्यातील मंदिरांची झालेली दुरावस्था यासह अनेक प्रश्न उपस्थित केले.

प्रश्नांची दखल घेत वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनक्षेत्रपालांना याबाबत सूचना दिल्या. पुढील काळात या समस्या वारंवार उदभवू न देता त्याचा वेळीच निपटारा करण्यात यावा व याबाबत वन विभागाने दक्ष राहावे अशी सूचना देखील यावेळी त्यांनी दिली.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top