सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आज संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये जिल्ह्यासाठी 460 कोटींचा आराखडा जिल्हा सर्वसाधारण योजनेचा असून हा निधी विहित मुदतीत यंत्रणांनी 100 टक्के खर्च करावा यासाठी आत्तापासून नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध योजनांचा आढावा घेत असतानां जिल्हा वार्षिक याजनेंतर्गत करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्णच असली पाहिजेत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. रस्ते तयार झाल्यानंतर अल्पावधीतच त्यावर खड्डे पडणे ही बाब अंत्यत चुकीची असून गुणवत्तापूर्ण कामे न करणाऱ्या कंट्राटदारांवर यंत्रणांनी कारवाई करावी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या योजनांवर यंत्रणांनी तात्काळ अंमलबजावणी सुरु करावी. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बसेस अपुऱ्या पडत आहेत. अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

