सातारा दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्रातील एक जेष्ठ विचारवंत आणि लेखक अशी ख्याती असणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे व रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. आर. डी. गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली.
आस्तिक शिरोमणी, चार्वाक, बळीवंश, विद्रोही तुकाराम, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुध्द हि पुस्तक लिहून समाजातील सर्वच स्तरातील व वयोगटातील लोकांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान डॉ.आ.ह.साळुंखे यांनी दिले आहे.
त्यांच्या विचारातून मेंदू स्वच्छ होतोच शिवाय आदर्श जीवन शैलीची परिपकव मूल्ये कोणती याचे सार ही समजते. मानवतेचं तत्त्वज्ञान काय ? जगण्याचं तत्त्वज्ञान काय ? या विषयांवर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात या धावत्या भेटीत अनेक गोष्टी सोदाहरण स्पष्ट केल्या. ही ग्रेटभेट माझ्या नेहमी स्मरणात राहील.

