सावंतपुर वसाहतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भरत घाडगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानिमित्त त्यांचे पक्षात स्वागत केले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान अद्वितीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विकासात्मक विचारधारेवर विश्वास ठेवत श्री भरत घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लोकांच्या वाढत असलेल्या विश्वासाचेच प्रतीक आहे.
यावेळी समवेत जिल्हा परिषद सदस्य मा. शरद लाड व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते..
