स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स अँण्ड कॉमर्स, सातारा यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रतिज्ञा पत्र देऊन माझा सत्कार करण्यात आला. याबद्दल संस्थेचा मनःपूर्वक आभारी आहे.
सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यात ज्या सेनानींनी सक्रिय भाग घेतला अशा थोर लढवय्यांमध्ये क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचे नाव नेहमीच अग्रक्रमाने घेतले जाते. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या सुदृढ रचनेसाठी त्यांनी पुढाकार घेत सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने अमीट छाप उमटविली. स्वातंत्र्यपूर्व काळात देशप्रेमाने झपाटलेला आक्रमक, कठोर, धाडसी वीर ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विकासाची नवनवी दालने शोधण्यासाठी धडपडणारे संयमी समाजसेवक ही त्यांची रूपे नेहमीच प्रेरणा देतात. आज सत्कार स्वीकारताना आनंद झाला. बापूंच्या कार्याला नव्याने उजाळा देण्यात आला.



