गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो त्यापेक्षा मोठा गुन्हेगार गुन्हा लपवणार असतो ( #हाथरस योगी सरकारच भयानक सत्य )
काही दिवसापूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या हाथरसच्या घटनेनंतर रोज काही नवीन बातम्या येत आहेत!
*२०१२* साली दिल्ली मध्ये सुद्धा एक अशीच केस झाली होती ‘ *निर्भया प्रकरण’.* त्यावेळी अक्षरशः जनता रस्त्यावर उतरली होती. इंडिया गेट पर्यंत कँडल मार्श झाले होते आणि निर्भयाच्या कुटुंबाने शेवट पर्यंत न्यायासाठी लढा दिला आणि शेवटी ८ वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला. त्यावेळी केंद्रात *काँग्रेसचे सरकार* होते. त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा निर्भयाला न्याय मिळवा म्हणून आवाज उठवला होता. आणि #लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये गरिबापासन ते श्रीमंतापर्यँत आणि प्रत्येक जातीधर्माच्या नागरिकाला न्याय मिळवण्याचा हक्क आहेच* .
पण हाथरस मध्ये झालेल्या घटनेनंतर उत्तरप्रदेश पोलीस आणि आदित्यनाथ सरकारची जर वागणूक बघितली तर *उ.प्र. मध्ये जंगलराज सुरु असल्याचं स्पष्ट होतं* . खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गळा दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरु आहे. आणि हि अत्यंत गंभीर बाब आहे. *पहाटे २.३० वाजता पीडितेच्या घरच्यांना घरात डांबून बाहेर पोलिसी पहारा लावून रातोरात प्रेताला अग्नी देणाऱ्या उ.प्र. पोलीसांनी
आणि सरकारने माणुसकी भर बाजारात विकली कि काय? असाच प्रश्न पडतो.* पीडितेच्या कुटुंबियांना धमक्या देऊन त्यांचे जबाब बदलण्यासाठी भाग पाडणे, पत्रकारांना अडवणे, इतर नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू न देणे, त्या गावात १४४ कलम लागू करणे! हे नेमकं काय सुरु आहे. या देशात परत एकदा ब्रिटिश राजवट लागू झाली की काय?
सत्तेत यायच्या आधी न्यायाच्या गोष्टी करणाऱ्या मोदी सरकारने यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ऐषोआरामच्या गोष्टी करण्यामध्ये जास्त मन रमवलेलं दिसतंय.
स्वच्छ कपडे आणि लाखो रुपयांचा मेकअप करून बाहेरील प्रतिमा स्वच्छ आणि चांगली दाखवता येईल पण *गरिबांची तोंडं दाबून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची प्रतिमा आता जनतेसमोर उघडी झाली आहे.
हि पण वेळ जाईल *लवकरच क्रांती होईल सर्वसामान्याना गोड़ बोलून फसवण्याचा उद्योग लवकरच बंद होईल हि बाबासाहेबांची लोकशाही आहे इथं जनताच ठरवेल गुंन्हेगार कोण?
