महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उदयोजकता विभाग कार्यक्रमांतर्गत , बेरोजगार तरुणांना इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, बांधकाम, अन्न प्रक्रिया, हस्तकला, फर्निचर आणि फिटिंग्ज, रत्ने आणि दागिने आणि चामड्याच्या तंत्रज्ञानासह 40 हून अधिक तांत्रिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. देशातील तरुण त्यांच्या आवडीचा प्रशिक्षण कार्यक्रम निवडण्यास स्वतंत्र आहे. पुढील पाच वर्षांसाठी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2022 अंतर्गत, केंद्र सरकार युवकांना उद्योजक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करेल.
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
- योजनेचे नाव- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)
- योजनेचा प्रकार- राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रामधील कौशल्य प्रशिक्षण देणे
- योजनेचा उद्देश- राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील 11 क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत.- बांधकाम ( construction )
- उत्पादन व निर्माण (Manufacturing & Production)
- वस्त्रोद्योग ( Textile)
- आटोमोटीव ( Automobile)
- आतिथ्य ( Hospitality )
- आरोग्य देखभाल (Healthcare )
- बँकिंग , वित्त व विमा (Banking , Finance & Insurance)
- संघटीत किरकोळ विक्री ( Organized retail)
- औषधोत्पादन व रसायने (Pharmaceutical & Chemicals)
- माहिती तंत्रज्ञान व सलग्न (IT and ITes)
- कृषी प्रक्रिया (Agro Processing) इतर अन्य महत्वाची क्षेत्रे , उदा. कृषी , जेम्स ॲंड ज्वेलरी इत्यादी.
- वय- 15 ते 45 वर्षे
- कागदपत्रे- आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणा करीता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्या संबंधीचे सर्व प्रमाणपत्रे
- लाभाचे स्वरूप- प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणा-या प्रशिक्षणावर होणा-या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 4 मजला, एम.टी.एन.एल. बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005.
- Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ-
https://kaushalya.mahaswayam.gov.in OR https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/find_center
- योजनेचे नाव- रोजगार मेळावे
- योजनेचा प्रकार- योजनेत्तर
- योजनेचा उद्देश- रोजगार इच्छुक उमेदवार व योग्य मनुष्यबळाची निकड असलेल्या उद्योजकांना एकत्र आणून उद्योजकांना तात्काळ योग्य मनुष्यबळ व बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- अट- उमेदवार व उद्योजक यांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नांव नोंदणी करणे आवश्यक.
- वय- 15 ते 45 वर्षे
- कागदपत्रे- नांवनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- लाभाचे स्वरूप- नोकरीची संधी
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे.
- Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ- http://www.maharojgar.gov.in
- योजनेचे नाव- करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
- योजनेचा प्रकार- योजनांतर्गत योजना
- योजनेचा उद्देश- सध्याच्या जागतिकरणाच्या काळात रोजगाराच्या संधींचे स्वरुप बदलले आहे. रोजगाराच्या नवनवीन संधीबाबत माहिती नसल्याने तथा त्यास अनुरुन पात्रता धारण करीत नसल्याने मोठया संखेने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे माहिती व मार्गदर्शनाभावी रोजगारापासून वंचित राहत आहेत. यामुळे, रोजगारांच्या संधीची माहिती व मार्गदर्शन बेरोजगार उमेदवारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात येणाया बेरोजगार उमेदवारासाठी करिअर ग्रंथालय सष्य अभ्यासिका सुरू करून यामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, मासिके, करिअर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- अट- उमेदवाराने जिल्हयाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
- वय- 15 ते 45 वर्षे
कागदपत्रे- नांवनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे - लाभाचे स्वरूप-
- ग्रंथालयामधून विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके, वृत्तपत्रे इ. उपलब्ध करुन दिले जातात.
- अभ्यासिकेमध्ये नियमित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात येते.
- रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येते.
- अर्ज करण्याची पद्धत– ग्रंथालय व अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी संबधित कार्यालय प्रमुखाना विनंती अर्ज देणे.
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता– जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे/ विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे/ आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रे
- उमेदवारांनी सदर ठिकाणी ऑफलाईन अर्ज करावेत.
- योजनेचे नाव– रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
- योजनेचा प्रकार– योजनेत्तर
- योजनेचा उद्देश– विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
- अट– उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
- वय– 15 ते 45 वर्षे
- कागदपत्रे– नांवनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- लाभाचे स्वरूप– सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा रुपये ३००/ ते १०००/ रुपये प्रमाणे होते.
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता– कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई
- Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ– http://www.maharojgar.gov.in
- योजनेचे नाव– बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था
- योजनेचा प्रकार– योजनेत्तर
- योजनेचा उद्देश– बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटया यांचेमार्फत ग्रामीण तसेच शहरी जनतेला आणि विविध शासकीय विभाग तसेच खाजगी क्षेत्रास विविध दैनंदिन सेवा उपलब्ध करुन देणे व याव्दारे बेरोजगार उमेदवारांना रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- अट– उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नांव नोंदणी करणे आवश्यक. कमीत कमी अकरा उमेदवार एकत्रित करुन सहकारी सेवा संस्था स्थापन करणे.
- वय– 15 ते 45 वर्षे
- कागदपत्रे– नांवनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- लाभाचे स्वरूप– स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे.
- Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ– http://www.maharojgar.gov.in
- योजनेचे नाव– महाराष्ट्र राज्यात व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करणे
- योजनेचा प्रकार– योजनांतर्गत योजना
- योजनेचा उद्देश– उमेदवारांची मुल्यमापन चाचणी करणे व समुपदेशन करुन रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सहाय्य करणे.
- अट–
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये वेब पोर्टल येथे नाव नोंदणी बेरोजगार उमेदवार.
- शैक्षणिक पात्रता१० वी/१२ वी, आयटीआय, पदवीधारक, पदवीधारक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित, शिक्षण सोडलेले, कुशल अथवा अकुशल उमेदवार.
- नोकरीचा अनुभव असलेले अथवा नसलेले बेरोजगार उमेदवार
- वय– 14 ते 40 वर्षे
- कागदपत्रे– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संकेतस्थळावर (www.maharojgar.gov.in) नोंदणी
- लाभाचे स्वरूप–
- उमेदवार व उद्योजकांची नोंदणी करणे/नोंदणी वाढवणे.
- उमेदवारांची मुल्यमापन चाचणी(Assessment Test) वर्तणुक चाचणी(Behavioral Test), मानसशास्त्रीय चाचणी, (Psychological Test) कौशल्यचाचणी(Skill Test) , कल चाचणी (Aptitude Test)घेणे.
- वरीलप्रमाणे चाचणीवर आधारीत आवश्यक त्या प्रशिक्षणाबाबत उमेदवारांना मार्गदर्शन/शिफारशी करणे. उमेदवारांना रोजगाराकरीता मार्गदर्शन व समुपदेशन करुन मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देवुन रोजगार उपलब्ध करुन देणे. उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करुन त्याकरीता प्रोत्साहीत करणे व स्वयंरोजगार उपलब्ध होईल या ष्टीने सहाय्य करणे.
- अर्ज करण्याची पद्धत– व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रात प्रत्यक्ष भेटी देवुन सेवा उपलब्ध करुन घेणे.
- संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता– कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय पत्ता: ३ रा मजला(विस्तारित), कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई४०० ६१४.
- उमेदवारांनी सदर ठिकाणी ऑफलाईन अर्ज करावेत.