परिचय

About-arun-anna-lad

सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य

आ. अरुण गणपती लाड

अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.

पुरस्कार

2007

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार 2007

2007

अँड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते अविष्कार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार 2007

2015

सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा राष्ट्रभाषा सेवक पुरस्कार 2015

2016

आधार सोशल संस्थेचा आधार महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2016

2016

श्री. ल. वि. तथा बाळासाहेब गलगले सामाजिक विकास मंडळ, सांगली यांचा कै. मा. बाळासाहेब गलगले स्मृती सेवा पुरस्कार 2016

2018

मन फाउंडेशन, वारंगा फाटा यांच्यावतीने दिला जाणारा वनश्री पुरस्कार 2018

विचारधारा

“ विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने प्रयत्न करावेत व तांत्रिक व्यावसायिक शिक्षण घेऊन उमेदीने स्वयंरोजगार करून बेकारीच्या संकटावर मात करावी आणि समाजाच्या प्रगतीसही हातभार लावावा, त्याशिवाय तरणोपाय नाही.” “अनेकांनी चालबाजीने किंवा नको त्या पद्धती वापरून थोड्याशा कष्टाने राजकारण साधले, पदे मिळवली, सत्ता मिळवली. असले राजकारण करावे असेही कधी वाटले नाही आणि तशा राजकारणाने आम्हास शिवलेही नाही.” “बापूंचे सगळे समर्पित जीवन आदर्श म्हणून डोळ्यासमोर असल्याने तशीच जीवन पद्धती स्वीकारणे पसंद केले.” “इतक्या ऐतिहासिक अडचणी क्रांतीच्या उभारणीत आणल्या गेल्या तरीही क्रांतीची निर्मिती झाली. तो कारखाना देशात एक नंबर ठरला पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट घेतले. आज कारखाना सर्वच बाजूंनी एक नंबर ठरला आहे.” “मुलांना चांगले गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी एकही पैसा न घेता शिक्षक घ्यायचे, विद्यार्थ्यांना कोणत्याही मार्गाने न लुबाडता शाळा-कॉलेज चालवायचे, या धोरणाने पैसा मिळाला नसेल, संस्थेचा विस्तार झाला नसेल पण एक वैचारिक बैठक घेऊन संस्था चालवली जात आहे. यात जे मानसिक समाधान आहे ते शिक्षण सम्राट होऊन मिळणार नाही. म्हणून झालेल्या प्रगतीमध्ये आम्ही समाधानी आहोत.”

- अरुण लाड

सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य